प्रस्ताव सादर करण्याचे मत्स्य विभागाला आदेश
*💫मालवण दि.०४-:* पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या क्रियाशील मच्छीमारांसाठी मासेमारी बंदी कालावधीत उदरनिर्वाह आणि पोषणासाठी आर्थिक सहाय्याची योजना आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी १५०० रुपये तर लाभार्थी हिस्सा १५०० रुपये इतका आहे. लाभार्थी मच्छीमार सहकारी संस्था किंवा नोंदणीकृत संघटनेचा सभासद असावा. १८ ते ६० या वयोगटातील दारिद्र्यरेषेखालील मच्छीमारालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थ्यांचा परिपूर्ण प्रस्ताव सर्व कागदपत्रांसह सहा प्रतीत सादर करण्याचे आदेश मत्स्य विभागाला देण्यात आले आहेत.
