राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाद्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या वाढदिवसाचे औचित्य
*💫सावंतवाडी दि.०४-:* राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रीक यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीनं ‘कोरोना किट’चं वाटप करण्यात आलं. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोव्हीड सेंटरसाठी फेस शिल्ड, मास्क, सॅनिटायझर, आय ग्लासेस आदी कोरोना किटच वाटप वाढदिसाच औचित्य साधून करण्यात आल. तर उपजिल्हा रुग्णालया बाहेरील रिक्षा चालकांना मास्कच वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजू धारपवार यांचा हस्ते या किटच वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, अल्पसंख्याक उप जिल्हाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, पदवीधर मतदारसंघ तालुकाध्यक्ष प्रसाद दळवी, विद्यार्थी संघटना शहराध्यक्ष कौस्तुभ नाईक, सोहेल शेख, राजू मळीक आदी उपस्थित होते.
