डॉ शामाप्रसाद मुखर्जी स्मृतिदीन सप्ताहाचे आयोजन

वेंगुर्ले भाजपाचे आयोजन:६ जुलै पर्यंत कार्यक्रम

*💫वेंगुर्ले दि.०४-:* जनसंघाचे संस्थापक व भाजपाचे प्रेरणास्त्रोत डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन २३ जुन आणि जन्मदिन ६ जुलै या कालावधीत स्मृतिदिन सप्ताहा चे आयोजन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आले.आज ३ जुलै रोजी परबवाडा ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र परीसरात वृक्षारोपण व वृक्षवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी वृक्षारोपणाबाबत जनजागृती करुन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी असे आवाहन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले . यावेळी परबवाडा उपसरपंच संतोष सावंत , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व माजी उपसरपंच संजय मळगांवकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परबवाडा तंटामुक्ती अध्यक्ष सुनील हरी परब , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , डाॅ.बाळु गवंडे , कांता देसाई , वायरमन साटेलकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी जगदीश परब व सिध्देश कापडोसकर तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .

You cannot copy content of this page