नैसर्गिक पर्यावरण संवर्धन-मानवता विकास संस्था भारतची दोडामार्ग कार्यकारिणी जाहीर

तुषार देसाई अध्यक्ष, राजाराम फर्जद महिला अध्यक्षपदी नेहा ठाकूर

दोडामार्ग महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, भारत सरकार नीती आयोग प्रमाणित ‘नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत’ या संस्थेच्या दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी तुषार तुकाराम देसाई, उपाध्यक्षपदी राजाराम फर्जंद यांची तर महिला तालुका अध्यक्षपदी सौ. नेहा ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. “पर्यावरणाचे रक्षण हेच देशाचे संरक्षण” हे या संस्थेचे ब्रीद आहे. संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक होऊन यामध्ये दोडामार्ग तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. तुषार देसाई यांनी पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेऊन तसेच नेफडो च्या अंतर्गत पर्यावरण प्रेमी या नात्याने पर्यावरण रक्षणाचे निस्वार्थी, प्रामाणिक कार्य करावे या अपेक्षेने त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिपक भवर, कोकण विभाग अध्यक्ष प्रकाश कदम, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दिनकर पाटील, जिल्हा अध्यक्षा संजना गवस यांनी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page