प्रसंगी मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार करणार:परशुराम उपरकर
*💫कणकवली दि.३०-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेला सोबत घेऊन कणकवली प्रांत कार्यालयात घंटानाद आंदोलन केले,त्यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्यांनी असंवेदनशीलता दिसून आली.चाकोरीबद्ध बोलणारा अधिकारी जिल्ह्यात पाहिला आहे.जनतेच्या प्रश्नांवर त्या महिला अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद होती.तसेच कणकवली नायब तहसीलदार ज्यांच्याकडे या चौकशीसाठी जबाबदारी आहे,त्यांनी वैभववाडी व राजापूर तालुक्यातील भ्रष्टाचाराचे पराक्रम केले आहेत,ते जनतेला न्याय काय देणार? शासन निर्णय काय आहे?याचा अभ्यास त्यांनी केला नाही.लोकांची गाऱ्हाणी सांगायला गेलो तेव्हा त्या महिला अधिकाऱ्यांनी दिलेली वागणूक चुकीची आहे.याबाबत मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.त्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीचा आम्ही निषेध करतो असे परशुराम उपरकर म्हणाले. मनसे नेते परशुराम उपरकर यांनी ऑनलाइन पद्धतीने पत्रकारांशी संवाद साधला .यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. परशुराम उपरकर म्हणाले, खासगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची लूट केली.त्यासंदर्भात जनतेचे आंदोलन होते,आम्ही प्रश्न मांडत असताना त्या महिला अधिकाऱ्यांची सहनशीलता दिसली नाही.हे अधिकारी जनतेचे सेवक असताना असंवेदनशीलता कशी दाखवितात.अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नव्हती. सद्या तालुका बिल तपासणी प्रमुख श्रीमती पाटील रजेवर आहेत.तोपर्यंत प्रभार वैभववाडी व राजापूर तालुक्यातील पराक्रम केलेल्या अधिकाऱ्याकडे आहे.भ्रष्टाचार कसा आणि किती वेळा केला हे जनतेला माहीत आहे.वाढीव बिलांची चौकशी यांच्याकडे राहिल्यास गोरगरीब रुग्णांना न्याय मिळणार नाही.पूर्वीची बिले जी अतिरिक्त घेतली आहेत ती परत केली पाहिजे.एक महिना नव्हे,तर कोविड सुरु झाल्यापासून पूर्ण तपासणी झालीच पाहिजे.अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे. त्या अधिकाऱ्यांच्या वागणुकीचा निषेध करतो. जनतेच्या भावनेशी खेळत आहेत.न्याय न मिळाल्यास मंत्र्यांकडे आंदोलन करु, जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करु,त्या सहा रुग्णांच्या नातेवाईकांना अद्याप पैसे दिलेले नाही.पालकमंत्री जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत.खासगी कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार काय केले?तपासणी काय केली? त्या खासगी रुग्णालयात उपचार पद्धती काय आहे ? याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून घेणार आहे. काही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सेवा रुग्णालयात असून देखील लाभ रुग्णांना दिला जात नाही.याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तक्रार करणार आहे,त्याची प्रत जिल्हाधिकारी यांना देणार आहे असेही परशुराम उपरकर यांनी सांगितले.
