संजू परब यांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल
*💫सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांसाठी निधी शिवसेनेने आणला, असा दावा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हा ठराव पंचायत समितीमध्ये झाला तेव्हा रूपेश राऊळ उपस्थित पण नव्हते. शिवसेनेला श्रेय घेऊन ठेकेदारांकडून चिरीमिरीसाठी केलेला हा उपद्व्याप होता, असा हल्लाबोल भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पत्रकार परिषदेत केला. परब म्हणाले, फुकटच श्रेय रुपेश राऊळ यांनी घेऊ नये, हे श्रेय भाजपच आहे. या मंजूर रस्त्याची भुमिपुजन भाजपच करणार असून शिवसेनेला श्रेय घेऊन ठेकेदारांकडून चिरीमिरीसाठी केलेला हा उपद्व्याप एक उपद्व्याप आहे तर शिवसेनेनं जिल्ह्याचा परत गेलेला निधी परत आणून दाखवावा जाहीर सत्कार करून असं आव्हान परब यांनी दिले. यावेळी पंचायत समिती. सभापती मानसी धुरी, उपसभापती शितल धुरी, रविंद्र मडगावकर, पंढरीनाथ राऊळ, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.