वैभववाडी प्रतिनिधी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यातील वायरमन यांना रेनकोट व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, माजी सभापती शुभांगी पवार, महिला पदाधिकारी प्राची तावडे, माजी नगरसेवक संताजी रावराणे शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक संजय सावंत, आशिष रावराणे, उदय पांचाळ, शाखा अभियंता मुल्ला प्रदीप नारकर आदी उपस्थित होते. तोक्ते वादळात चांगले काम वायरमन यांनी केले. वैभववाडी तालुक्यातील सेक्शन 1 मधील सर्व वायरमन यांना माजी नगरसेवक संताजी रावराणे पुरस्कृत रेनकोट व मास्क देण्यात आले. यावेळी संजय मोरे, लाईनमन गणेश पाटेकर, सुहास गुरव, महमदहसन पाटणकर, समाधान कुळये, राजेंद्र गायकवाड, मंगेश पाताडे, मंगेश पवार, मनिष सावंत, रसूल मुकादम, अविनाश गुरव, रवींद्र लाड आदी उपस्थित होते. यावेळी नासीर काझी म्हणाले, तोक्ते वादळात सर्वात जास्त नुकसान हे वीज वितरण कंपनीचे झाले होते. अनेक गावे अंधारात होती. वीज वितरण अधिकारी, वायरमन, लाईनमन व कंत्राटी कामगार यांच्या सांघिक कामामुळे वीज पुरवठा लवकर सुरळीत झाला. त्यांनी या संकटात केलेले काम आम्ही कदापिही विसरणार नाही. चांगल्या कामाचे नेहमी कौतुक करणे अशी शिकवण आदरणीय नारायण राणे साहेबांनी आम्हाला दिली आहे. त्यांचे संस्कार आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर आहेत. वीज वितरण कंपनीचे वायरमन व कंत्राटी कर्मचारी यांच्या समस्या, अडचणी राणे साहेबांच्या माध्यमातुन सोडविल्या जातील अशी ग्वाही काझी यांनी दिली. तालुक्यात सामाजिक उपक्रम राबवणारे माजी नगरसेवक संताजी रावराणे यांचेही काझी यांनी कौतुक केले.
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील वायरमन ना रेनकोट आणि मास्कचे वाटप
