आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रावराणे विद्यालय परिसरात वृक्षारोपण

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून पार पडला कार्यक्रम*

वैभववाडी प्रतिनिधी भाजपा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय परिसरात वैभववाडीचे माजी नगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. आमदार नितेश राणे यांचे नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य या संस्थेला मिळाले आहे. यावेळी संजय सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना मनोगतातून शुभेच्छा दिल्या. आ. नितेश राणे यांचे प्रशालेस असलेले सहकार्य, मार्गदर्शन नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देते. त्यांचे विद्यालयाप्रती असणारे प्रेम असेच कायम राहु दे. असे प्रशालेचे शिक्षक शिंदे सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर सर, शिंदे सर कापसे सर, तुकाराम बावदाणे झोरे सर,चोरगे सर पी एम पाटील सर, अंकित सावंत, संतोष माणकर , तसेच प्रशालेचे इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page