*अन्यथा ठेकेदाराला एक रुपया देखील मिळू देणार नाही; शिवसेना शहर प्रमुख प्रदीप रावराणे यांचा इशारा
वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी शहरात मंजूर झालेली पावणे दोन कोटीची कामे दर्जेदार व्हावीत. त्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्यास संबंधित ठेकेदाराला झालेल्या कामाचा एकही रुपया मिळू देणार नाही असा इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रदीप रावराणे यांनी दिला आहे.तसेच या कामावरती देखरेखीकरिता शिवसेनेमार्फत खासगी अभियंत्यांची नेमणूक करणार असल्याचे रावराणे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर केले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात अस म्हटल आहे की, वैभववाडी शहराच्या विकासकामासाठी पालकमंत्री उदय सामंत व खा.विनायक राऊत यांनी १कोटी ७० लाख ७१ हजार ८५३ रुपयांचा निधी दिला आहे. शहरात १० जानेवारीला आलेल्या पालकमंत्री व खासदार यांनी या कामांबाबत घोषणा केली होती. त्याची वचनपुर्ती त्यांनी केली. शहरातील नऊ विकास कामांसाठी पावणेदोन कोटीचा निधी दिला आहे. प्रशासनाने या निधीचा सुदुपयोग करावा.सर्व कामे दर्जेदार करण्यात यावी.या कामांमध्ये त्रुटी राहील्यास ठेकदाराला एकही रुपया मिळू देणार नाही. तसेच या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी शिवसेनेकडून खाजगी अभियंता नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
