युवासिंधू फाऊंडेशन चा वतीने उद्या मळगाव हायवे परिसरात वृक्षारोपण मोहीम

*पर्यावरण प्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन

*💫सावंतवाडी दि.२३-:* युवासिंधू फाऊंडेशन चा माध्यमातून उद्या वटपौर्णिमेचे औचित्य साधत वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले आहे. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी या मोहिमेत कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सहभागी व्हावे असे आवाहन फाउंडेशनच्या सदस्यांनी केले आहे. यावेळी मळगाव हायवे येथे वृक्षारोपण केले जाणार असून, सकाळी ७:३० वाजता या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. तरी पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावे.

You cannot copy content of this page