अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले…

*💫सावंतवाडी दि.२३-:* मळगाव रेल्वे स्टेशन येथे अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश श्री. आर.बी.रोटे यांनी फेटाळले . याकामी विशेष सरकारी अभियोक्ता अँड. अजित उर्फ एस एन भणगे यांनी पीडितेच्यावतीने काम पाहिले. अँड. स्वप्ना सामंत, अँड मिहिर भणगे, अँड सुनील मालवणकर यांनी याकामी त्यांना मदत केली आहे. याकामी तपास ए. पी. आय. स्वाती यादव यांनी केला आहे. बुधवारी या प्रकरणातील तिन्ही आरोपीं विरोधात न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात आले आहे. ही घटना मळगाव रेल्वेस्टेशन येथे २१ सप्टेंबर २०१८ रोजी घडली होती. यापूर्वी देखील सदर आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते.

You cannot copy content of this page