एक संशयित अटक;न्यायलयाने २८ जुन पर्यंत सुनावली पोलिस कोठडी*
*💫मालवण दि.२३-:* एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्या प्रकरणी मालवण तालुक्यातील तीन तरुणांविरोधात मालवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील एका संशयिताला अटक करून जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २८ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली आहे. पीडित अल्पवयीन युवती व तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवार २२ जून रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी बुधवार २३ जून रोजी सकाळी दिली आहे. बालकांचे लैंगिक शोषण व अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून ओरोस येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला अधिकारी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पोक्सो कायद्याचा विचार करता पीडित अथवा संशयितांची नावे अथवा अन्य कोणतीही अधिक माहिती देता येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
