*💫सावंतवाडी दि.२३ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ४५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ८ तर ग्रामीण भागात ३७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात खासकीलवाडा ४, सबनीसवाडा १, माठेवाडा १, पोलिसलाईन २ तर ग्रामीण भागात माडखोल १, दाणोली १, बांदा ९, इन्सुली १, नेतर्डे १, शेरले ५, सोनुर्ली ९ , माजगाव २, चराठा १, कारीवडे २, कोलगाव ३, सांगेली १, शिरशिंगे १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ४६० रुग्ण सक्रिय आहेत.
