सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्या सेवन करा

माजी खास.सुधीर सावंत यांचे हळवल येथे मार्गदर्शन

*💫कणकवली दि.२३-:* मानवाने हंगामानुसार मिळणार्‍या रानभाज्यांचे सेवन रोजच्या आहारामध्ये करावे. स्वत:च्या परसात विविध जातींच्या भाज्यांची लागवड नैसर्गिक पद्धतीने करावी. गावातून रासायनिक खते, किटकनाशके हद्दपार करावी, रोजच्या रोज आवळ्याचे सेवन करावे असे कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसचे संस्थापक अध्यक्ष माजी बखासदार ब्रिगे. सुधिर सावंत म्हणाले. कृषि विज्ञान केंद्राद्वारे कणकवली तालुक्यातील हळवल गावामध्ये जलशक्ती अभियान अंतर्गत परसातील भाजीपाला लागवड या विषयी बचत गटांच्या महिला प्रतिनिधींसाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसचे संस्थापक अध्यक्ष मा.खासदार ब्रिगे. सुधिर सावंत यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले. ज्याचे आरोग्य सुदृढ असते त्याचेच जीवन आनंदी होऊ शकते म्हणून प्रत्येकाने आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. नैसर्गिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाव असून या पद्धतीने तयार केलेल्या शेत मालाला मोठ्या प्रमाणात मागणी असून शेतकर्‍यांच्या शेत मालाला मुंबईमध्ये मार्केटिंग करण्यास कृषि प्रतिष्ठान मदत करेल. हळवल गाव कणकवलीच्या जवळ असून या गावाचा समावेश कृषि प्रतिष्ठांनच्या समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पामध्ये करण्यात येईल. त्यासाठी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन व मुंबईतील चाकरमान्यांना सोबत घेऊन गाव विकास संघ स्थापन करावा असे आवाहन माजी खासदार सुधिर सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर यांनी केले. तसेच हळवल गावात यापूर्वी ब्लॅक राईस, झिंक राईस सारख्या देशी भात वाणांची व भुईमूगाच्या व भाताच्या सुधारीत जातींची प्रात्यक्षिके घेतली त्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला कृषि प्रतिष्ठानचे सल्लागार भास्कर राणे, सचिव राजेंद्र सावंत (डोंगरे), कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत, बाळकृष्ण गावडे, विकास धामापूरकर, विवेक सावंत भोसले, प्रा. चैताली राणे, प्रा. विवेक राणे, मयूर सावंत उपस्थित होते. समाज सेविका अर्चना पटेल, तसेच हळवल गावातील राजेंद्र राणे, अरुण राणे, अनंत राणे, गणेश राणे, संदीप गुरव, रोहित राणे, अक्षय सावंत, मारुती राणे उपस्थित होते. तसेच महिला बचत गट प्रतिनिधी उपस्थित होत्या. उपस्थितांना कृषि विज्ञान केंद्राद्वारे परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी भाजीपाला बियाणे किट व काजू कलमांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. चैताली राणे व सौ. तुलसी पालकर यांनी सहकार्य केले. आभार डॉ. विलास सावंत यांनी मांडले.

You cannot copy content of this page