आम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
*💫कणकवली दि.२३-:* तौक्ते वादळात आणि त्यानंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनमननी अथक मेहनत घेतली. कंत्राटी कामगार असूनही दिवसरात्र मेहनत घेत कर्तव्य बजावणाऱ्या कणकवली तालुक्यातील 50 कंत्राटी लाईनमनना भाजपाच्यावतीने आम.नितेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रेनकोट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कंत्राटी कामगार असूनही रात्रंदिवस काम करताना भाजपाने आपल्या कामाची दखल घेतल्याबद्दल कंत्राटी लाईनमननी समाधान व्यक्त केले. दरम्यान, जि. प.अध्यक्षा संजना सावंत, पं. स. सभापती मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते सदर रेनकोटचे वितरण भाजपा कार्यालयात करण्यात आले. यावेळी उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, तालुका सरचिटणीस महेश गुरव, युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्रज्ञा ढवण, सुशील सावंत, पप्पू पुजारे, सदानंद चव्हाण, सचिन पारधिये,सांगवे सरपंच मुंज, माजी पं स सदस्य राजश्री पवार आदी उपस्थित होते.
