सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेचा दिलासादायक निर्णय

रोजदारीवर असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती;कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले पदाधिकारी-प्रशासनाचे आभार

*💫ओरोस दि.२२-:* जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे गेली अनेक वर्षे रोजदारीवर कार्यरत असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेने कायमस्वरूपी नियुक्ती दिली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती पत्रे देण्यात आली. यामुळे ९ कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. कृष्णा शंकर निंबाळकर, प्रदीप एकनाथ वाडेकर, बाळकृष्ण रामचंद्र सावंत, आनंद बाबी शिरोडकर, दत्ताराम राजाराम सरमळकर, चंद्रकांत भिवा सावंत, अशोक धोंडू लाड, विकास वासुदेव घाडीगावकर, दिपक हरी काडगे या रोजंदारी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत कायम करत असले बाबतची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी महिला व बालविकास सभापती शर्वाणी गावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य राजेंद्र पराडकर, कार्यकारी अभियंता ग्रापापू श्रीपाद पाताडे व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडे रोजंदारीवर कार्यरत असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना कायम करणे बाबत २६ डिसेबर २०१९ रोजी झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 447 ने निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला होता. यावर निर्णय होऊन जिल्हा परिषदेच्या देखभाल-दुरुस्ती खाते क्रमांक 343 मधून यासाठी 90 लक्ष एवढी आर्थिक तरतूद केली आहे. रोजंदारी कर्मचारी यांचे शासकीय सेवेतील कामाचा विचार करून त्यांना नियमित केल्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाचे चीज झाल्याचे नियुक्ती पत्र मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केली आहे. काही नी आपल्या आनंदाश्रूतुन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही रोजंदारी कर्मचार्‍यांच्या बाबतीत निर्णय घेणारी पहिलीच जिल्हा परिषद असल्याने आम्हाला देखील या गोष्टीचा सार्थ अभिमान असल्याचे वक्तव्य केले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत १९८६ सालापासून आम्ही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या यांत्रिकीकरण विभागात रोजंदारीवर काम केले पण आज अध्यक्ष श्रीमती संजना सावंत यांच्या प्रयत्नामुळे आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत आज रुजू करण्यात आले त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page