*पालकमंत्री उदय सामंत यांनी संजू परब यांचे नाव न घेता लगावला टोला*
*💫सावंतवाडी दि.१८ प्रसन्न गोंदावळे-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पोझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व नियम शिथिल करण्यात आले असून, कोणाचाही धमक्यांना भिऊन हे सुरू केले आहे असे वाटत असेल तर हा त्यांचा भ्रम असेल असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांना लगावला आहे. व्यापाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही चुकीची स्वप्ने पाहू नयेत असे देखील पालकमंत्री उदय सामंत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
