तपासी अधिकाऱ्यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केला सत्कार
*💫ओरोस दि.०५-:* कणकवली वागदे येथील आर्यादुर्गा मंदिरात दर्शनासाठी आलेल्या कुडाळ येथील एका महिलेला एस टी स्टॅंड वर सोडण्याच्या बहाण्याने घेऊन जात वाटेत त्यांच्यावर चाकूने वार करत त्यांच्या कडील पर्स, मोबाईल, रोक रक्कम आदी काढून घेत पळून गेल्या प्रकरणी मालवण तालुक्यातील असरोंडी येथील मधु सगु कोकरे (45) याला जिल्हा व सत्र न्यायाल्याने शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी तपास करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यानी शनिवारी विशेष सत्कार केला. चांगला व शात्रोक्त तपास केल्याने आरोपीला शिक्षा हावू शकली, असे गौरोउद्गार यावेळी दाभाडे यानी काढले. 14 फेब्रुवारी 2019 रोजी सबंधित महिला या वागदे येथील आर्यादुर्गा मंदिरात उत्सवानिमित्त दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर पुन्हा घरी जाण्यासाठी त्या वागदे बस स्टॉप येथे थांबल्या होत्या. यावेळी एका अनोळखी इसमाने येथे बस थांबत नाहि असे सांगितले. बस स्थानक दाखवतो असे सांगुन सोबत घेऊन जात कणकवली शिवाजी चौक ते मराठा मंडळ नाटय़गृहाजवळून वागदे गावी जाणाऱ्या रस्त्या लगत असलेल्या कणकवली बिजलीनगर क्रिस्टल रेसीडेन्सी इमारतीच्या पाठीमागील बाजूस कणकवली नगरपंचयतीच्या राखीव जागेतील नाल्यात धारदार हत्याराने चेहऱ्यावर व गळय़ावर वार केले होते. त्या जखमी झाल्यानंतर त्यांच्याकडील पर्स, रोख रक्कम व मोबाईल इत्यादी वस्तू घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणाची सुनावणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. यावेळी आरोपीला 7 वर्ष सक्त मजूरी आणि 500 रुपयांच्या दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड नभरल्यास 7 दिवसांची साधी कैद अशी अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे . या प्रकरणाचा तपास तत्कालीन परिवीक्षाधीन पोलिस उपअधीक्षक कविता फडतरे व कणकवली पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सध्या सागर सुरक्षा सिंधूदुर्ग एस बी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक व सध्या मालवण पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एस एस ओटवणेकर यानी केला होता. त्यांना तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक जयश्री पाटिल यांचे सहकार्य लाभले होते. या तपासात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी पी खरात, यू के पवार, हवालदार एस एन सय्यद, आर आर कडुलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पैरवी अधिकारी उपनिरीक्षक शाहनवाज मुल्ला, कोर्ट ड्यूटी अंमलदार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एम आर ऐहोळे, व्ही एस नाईक यांचा सत्कार पोलिस अधीक्षक दाभाडे यानी केला. यावेळी गृह उपअधीक्षक संध्या गावडे उपस्थित होत्या.