नितेश राणे यांच्या कार्यकत्यांची मनस्थिती बिघडली-अनुप वारंग

*💫कणकवली दि.०५-:* थकबाकीदारावर कारवाई केली म्हणून कोणी बेताल वागत असेल तर समजून घ्या , त्यांची वृत्ती काय असेल.बरं हे बोलते कोण? जो अजून जिल्हा बँकेचा थकबाकीदार आहे तो..! नितेश राणे हे बँकेने कारवाई केलेले वाहन माझे नाही असे सांगत आहे , तर इकडे त्यांचेच कार्यकर्ते राणेंच्या ताफ्यातील गाडयांच्या थकबाकी वसुलीसाठी काढलेल्या नोटीसांच्या अनुषंगाने निवडणूकीत बदला घेण्याची भाषा करत आहेत . म्हणजे नेमके खरे कोण ? नितेश राणे कि संदिप मेस्त्री …थकबाकीच्या नोटीस आधी काढल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित करताहेत त्यापेक्षा त्यांनी आपल्या नेत्यालाच विचारावे समाजाचे नेतृत्व करत असताना संस्थांची थकबाकी ठेवणे योग्य आहे का ?कदाचित त्याची मनस्थिती बिघडली का?असा सवाल कलमठ शिवसेना कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग यांनी केला आहे. थकबाकी संदर्भाने बँकेने काय केले ? याबाबत बोलण्याची वेळी आणू नका . नाहीतर आपण आणखीनच उघडे पडाल. त्यामुळे खोटी स्टंटबाजी करणे आता थांबवा . बँकेने केलेल्या कारवाईचा आणि निवडणूकीचा काहीही संबंध नाही . थकबाकीदारांवर कारवाई करणे हे बँकेचे काम आहे . ते सातत्याने चालू असते . मात्र थकबाकीदार कोणीही असला तरी कायद्याने सर्वाना समान न्याय असतो . त्यामुळे बँकेने केलेल्या कारवाईमुळे सर्व स्तरातून बँकेचे अभिनंदन केले जात आहे . संदेश पारकर यांचा नगरपंचायतीमधील पराभव हा भाजपचे प्रमोद जठार यांनी पारकरांसोबत केलेला धोका होता . आणि आता संदेश पारकर हे शिवसेनेत आहेत . त्यामुळे राजकारणातील व सहकारातील ज्ञान नसलेल्यांनी उगाचच वायफळ बडबड करू नये . त्यापेक्षा आपल्या नावावर असलेल्या गाडीची थकबाकी रक्कम वापरत असलेल्या नेत्याकडून भरून घेवून मोकळे व्हावे . नाहीतर कर्जबाजारी होण्याची पाळी तुमच्यावर येईल . त्यामुळे संदिप मेस्त्री यांनी इकडे तिकडे वेळ न दवडता आपले थकबाकीतील कर्ज भरणा करून तरुण वयात बसलेला थकबाकीदाराचा शिक्का घालवावा आणि हिम्मत असेल तर जिल्हा बँकेचे कर्जफेड करून अन्य कोणत्याही बँकेकडून कर्ज घेवून दाखवावे व मगच बदला घेण्याची भाषा बोलावी असा इशारा शिवसेना कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग यांनी प्रसिध्दीद्वारे दिलेला आहे .

You cannot copy content of this page