वर्दे येथील सावंत-भोसले समाजाचा उपोषणाचा इशारा

देवाचा चौथरा तोडणाऱ्यावर कारवाईची मागणी

*💫कुडाळ दि.१६-:* कुडाळ तालुक्यातील वर्दे गावातील आमचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिर त्याच्या बाहेर असलेली वशिक देवतेची मूर्ती १२ जून २०२० रोजी अज्ञात इसमाने तोडली होती. त्याठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा ४ जून २०२१ अज्ञान इसमाने तोडला आहे. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही. पुढील सात दिवसांत याबाबत कारवाई झाली नाहीतर वर्दे गावातील शेकडो सावंत-भोसले ग्रामस्थ पोलिस ठाण्यासमोर उपोषणाला बसतील, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page