नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापतींत ताळमेळ नाही

दोघांचे निर्णय वेगवेगळे; विशाल सावंत यांचा आरोप

*💫सावंतवाडी दि.१५-:* सावंतवाडीचे नगराध्यक्ष आणि सावंतवाडीचे आरोग्य सभापती यांच्यात ताळमेळ नाही का? असा सवाल युवासेनेचे शहर अधिकारी विशाल सावंत यांनी उपस्थित केला आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब हे काल सायंकाळी एक निर्णय जाहीर करतात तर सत्तधारी पक्षाचेच आरोग्य सभापती दुसऱ्याच दिवशी दुसराच निर्णय जाहीर करतात. परंतु, या दोघांच्या निर्णयाच्या खेळात सावंतवाडीतील जनतेची मात्र दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे सावंतवाडीतील जनता या दोन्ही निर्णयाच्या संभ्रमात आहे. काल नगराध्यक्ष पत्रकार परिषद घेऊन रॅपिड टेस्ट घराघरात जाऊन करणार अशी घोषणा करतात तर त्याच पक्षाचे आरोग्य सभापती दुसऱ्याच दिवशी रॅपिड टेस्ट घराघरात नाही, तर प्रभागवार नेमून दिलेल्या केंद्रावर केली जाईल आणि ज्यांना लक्षणे आहेत त्यांची टेस्ट केली जाईल असे जाहीर करतात. तर उद्या परत दुसरा कोणीतरी एखादा सत्ताधारी नगरसेवक उठेल आणि तिसराच निर्णय जाहीर करेल. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या मुख्याधिकारी यांनी कोणता निर्णय घेण्यात आला आहे. तो जाहीर करावा असे मत विशाल सावंत यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी नगरपालिका शहरासाठी कधी कोव्हिड सेंटर उभे करणार आहे. हे देखील जाहीर करावे असे देखील युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत म्हणाले आहेत.

You cannot copy content of this page