आशा व गटप्रवर्तक यांचा राज्य व्यापी बेमुदत संप सुरू…

*💫कणकवली दि.१५-:* महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 15 जून 2021 पासून बेमुदत संपाची हाक महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी समन्वय समितीने दिलेली आहे.यामुळे कोरोना काळात देवदूत ठरलेल्या राज्यातील 68 हजार आशा सेविका संपावर गेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन ने सुद्धा यात सहभागी होत काम बंद पुकारण्यात आले आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना संपाबाबत सविस्तर निवेदन दिलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर्स व गटप्रवर्तक या आंदोलनात सहभागी होत आहेत. सर्व आशा व गटप्रवर्तक सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेल्या असून त्यांनी कामकाज बंद केला आहे . कोरोना पाश्र्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला संपाचा फटका बसणार असल्याने संपावर काय निर्णय घेतात याकडे राज्यातील ६८ हजार आशा सेविकांचे लक्ष लागले आहेत.

You cannot copy content of this page