*कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत भाजप सर्वोतोपरी मदत करील

*भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांची ग्वाही*

*💫मालवण दि.१५-:* जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने जिल्ह्यातील कोरोना मुक्तीसाठी शासनाकडून कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपल्याला आपल्या जिल्ह्यातील नागरीकांचा जीव वाचवायचा असून या लढ्यात भाजपा कार्यकर्त्यांनी सक्रियपणे सहभाग घेऊन कोव्हीड-19 विरुद्धची लढाई जिंकावी यासाठी भाजप सर्वोतोपरी मदत करील अशी ग्वाही भाजप प्रदेश सरचिटणीस , माजी खासदार श्री.निलेश राणे यांनी येथे बोलताना दिली मालवण तालुक्यातील हडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोरोना बाधित रुग्णांसाठी शासन निर्णयाप्रमाणे ग्रामविलगीकरण कक्ष कै.के.जी. मांजरेकर शाळा हडी नं.1 येथे स्थापन करण्यात आला असून या कोव्हीड सेंटरचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि प बांधकाम व वित्त सभापती श्री.महेंद्र चव्हाण, सभापती श्री.अंजिक्य पाताडे, उपसभापती श्री. राजू परुळेकर , हडी सरपंच श्री.महेश मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.चिंदरकर, सौ.सौरभी अमरे, सौ.दर्शना वाडेकर, भाजप मालवण तालुका अध्यक्ष श्री.धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री.अशोक सावंत, भाऊ सामंत, श्री.बाबा परब, श्री.बाबा मोंडकर,श्री.विलास हडकर, कोरोना दक्षता समिती सदस्य श्री.निलेश नारिंग्रेकर, श्री.किशोर नरे, आरोग्य कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते. या विलगीकरण कक्षामध्ये २५ रुग्णांसाठी नेबिलायझर व्यवस्था, मोबाईल चार्जिंग व्यवस्था, आंघोळीसाठी गरम पाणी व्यवस्था, २४ तास पाण्याची व्यवस्था, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. देखरेखीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. शेवटी महेश मांजरेकर यांनी आभार मानले

You cannot copy content of this page