घोणसरी ग्रा. पं. च्या विलगीकरण कक्षाचे सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते लोकार्पण

*💫कणकवली दि.१५-:* कणकवली तालुक्यातील घोणसरी ग्रा. पं. च्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या 10 बेडच्या कोव्हीड -19 विलगीकरण कक्षाचे उद्घाटन कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते सरपंच मृणाल मकरंद पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कणकवली प.स.सभापती मनोज रावराणे यांनी स्वखर्चाने ५ बेड या विलगीकरण कक्षासाठी सुपुर्द केले आहेत. यावेळी उपसरपंच विलास मराठे, ग्रामसेवक एस बी गोसावी, आरोग्य सेवक एस आर राठोड, तलाठी लांबर, ग्रा. पं. सदस्य महेश येंडे, सुगंधा सावंत, अनिल राणे, कृष्णा एकावडे, तावडे, भाई राणे, जेरोन बारेत, राजेंद्र चव्हाण, व्हॅलेरियन पिंटो, दीपक राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page