राज ठाकरे वाढदिवस निमित्त मालवण मनसेचा सामाजिक उपक्रम
*💫मालवण दि.१५-:* मालवण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मालवण तालुका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि मालवण तालुका मनसेने मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली पणदूर अणाव येथील सविता आश्रमाला धान्य वाटप केले यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, सविता आश्रमचे अध्यक्ष नरेश चव्हाण, आणि सेक्रेटरी संदीप परब ,नितीन खानोलकर, मालवण महिला अध्यक्षा राधिका गावडे, निखिल गावडे, प्रतीक कुबल, साईराज चव्हाण, सचिन गावडे, दिनेश कदम, प्रतीक पार्टे, सुनील पेढरकर आदी उपस्थित होते. मनसेच्या या सामाजिक कार्याबद्दल सविता आश्रमचे नरेश चव्हाण, आणि संदीप परब यांनी आभार मानले.
