व्यापारी व नागरिकांनी विजवली मालवण बाजारपेठेतील घटना
मालवण दि मालवण बाजारपेठेतील मारुती मंदिर नजीक असणाऱ्या घाडीगांवकर यांच्या बंद असलेल्या स्टेशनरी दुकानातून आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक धुराचे लोट येत असल्याचे दिसताच भर पावसात व्यापारी आणि नागरिकांनी धावपळ करून आग शमविण्यात यश मिळविले मालवण बाजारपेठेत श्री घाडीगांवकर यांचे स्टेशनरी दुकान असून लॉक डाऊनमुळे श्री घाडीगांवकर यांचे दुकान बंद असते आज दुपारी अचानक या दुकानातून धुराचे लोट येऊ लागले यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचे तसेच व्यापाऱ्यांचे लक्ष जाताच त्यानी धावपळ करीत आग विजविण्याचा प्रयत्न केला या त्यांच्या प्रयत्नाला पावसाने साथ दिल्याने आग वेळीच आटोक्यात आली यावेळी व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर व अन्य व्यापाऱ्यांनी लगेचच धाव घेत मदतकार्य सुरू केले. दुकानांची शटर उघडून नेमका धूर कुठून येतो याबाबत आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाहणी करण्यात आली. दरम्यान, दुकानातील वायर शॉर्ट सर्किटने जळाल्याने धूर आल्याची चर्चा सुरू होती यावेळी दुकानातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. या दुकानाच्या बाजूला खेटून अनेक दुकाने असून आगीवर नियंत्रण आणण्यात यश मिळाल्याने मोठा अनर्थ टळला दरम्यान, आग लागल्याची घटना घडत असताना नगरपालिकेचा अग्निशमन बंब बंद असल्याने उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
