गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी मुंबई येथील दोघांना जामीन मंजूर

*💫सावंतवाडी दि.१५-:* गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बालाजी केदार आणि रकिसन दिवटेवाड (दोघेही रा. मुंबई) यांची आज न्यायलयाने प्रत्येकी १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुंबई येथील दोन्ही आरोपींची आज पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी अँड परशुराम चव्हाण यांनी जामीन अर्ज दाखल केला असता, त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायलयाने दोन्ही आरोपींना न्यायलयाने प्रत्येकी १५ हजाराचा सशर्त जामीन मंजूर केला आहे.

You cannot copy content of this page