डॉ विवेक रेडकर यांनी केला शुभारंभ
*💫वेंगुर्ले दि.१५-:* कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने रुग्ण संख्याही झपाट्याने वाढत असून त्याला अटकाव करण्यासाठी शासकीय आदेशाने रेडी ग्रामपंचायती मार्फत ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन् केले असता त्यांचे नातेवाईक नियम न पाळता मोकाट बाहेर फिरत असतात या बाबीचा विचार करून शासनाने प्रत्येक गावात शासकीय इमारती ताब्यात घेऊन पॉझिटिव रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्याचे ठरविले आहे.वाढत्या कोरडा विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर व त्यामुळे वाढत असलेले रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेडी ग्रामपंचायतीने शासनाच्या आदेशाने सेंट्रल प्रायमरी स्कूल रेडी नंबर एक या प्रशालेत ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात एकूण १६ बेड असून या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. विवेक रेडकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी माजी आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, सरपंच रामसिंग राणे, आरोग्य अधिकारी अश्विन माईनकर, डॉ. मोहन भागवत, राजेंद्र कांबळी, विद्याधर सुतार, विकी तोरस्कर, आयएलपीएल कंपनीचे मॅनेजर श्रीनिवास, शैलेश तिवरेकर, नंदकुमार मांजरेकर, गायत्री सातोस्कर, ग्राम विकास अधिकारी प्रल्हाद इंगळे, संजय कांबळी, लक्ष्मीकांत भिसे, विनोद नाईक, डॉ. स्नेहा नवार डॉक्टर रश्मी शुक्ला उपस्थित होते. या विलगीकरण कक्षेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर विवेक रेडकर म्हणाले ताप, सर्दी , खोकला, आजार उद्भवतात तेव्हा ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुठलाही आजार पटकन होत नसून त्याची सुरुवातीला लक्षणे आढळतात उपचार घेतल्यास तो रुग्ण पूर्ण बरा होतो. एखाद्या रुग्णाला जास्त त्रास होत असल्यास अश्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे. तसेच सर्दी खोकला ताप आल्यास रॅपिड टेस्ट करावी मिथिलोंन ब्लू हे औषध कोरोनाविषाणू चा नायनाट करण्यासाठी उपयुक्त आहे. या औषधाला शासनाने मान्यता देणे गरजेचे आहे. गाव मुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करूया कुठलेही रुग्णाला उपचार वेळेवर मिळणे गरजेचे आहे. मी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे विवेक रेडकर यांनी सांगितले. या विलगीकरण कक्षामध्ये ज्या रुग्णांना दाखल केले जाणार आहे त्या कक्षातील रुग्णांना जेवण, चहापाणी, नाश्ता आमदार दीपक केसरकर देणार असल्याचे माजी आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी सांगितले.
