*💫कणकवली दि.१५-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना खारेपाटण-सिंधुदुर्ग विभाग यांच्या वतीने खारेपाटण विभागामध्ये एकूण ५३ झाडांचे वाटप करून वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत साजरा केला. यावेळी खारेपाटण हायस्कूल व कॉलेजच्या संचालकांना तसेच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड19 च्या लसिकरणासाठी आलेल्या नागरिकांना व नडगिवे आणि चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना ५३ झाडांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खारेपाटण विभाग – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निम्मित हा उपक्रम हाती घेऊन पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न मनसे च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.यावेळी मनसे चे युवाकार्यकर्ते अक्षय जाधव ,योगेश गुरव,भावेश कावळे, यश पिसे, राज वीर ,विनायक बीळगी, तेजस मसूरकर, विरेश ब्रह्मदंडे,सागर कांबळे, श्रीराज वीर,मंगेश गुरव आदी उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण विभागात ५३ झाडांचे वाटप
