शिक्षक भारती दोडामार्ग तर्फे पत्रकारांना सुरक्षा कवच प्रदान

*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोडामार्गच्या (इलेक्ट्रॉनिक) सदस्यांना केले प्रदान

*💫दोडामार्ग दि.१४ सुमित दळवी-:* कायमच समाजपयोगी कामे करणाऱ्या शिक्षक भारती संघटनेने पुन्हा एकदा आदर्शवत उपक्रम राबवताना समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना कोरोना काळात रक्षण करणारे सुरक्षा कवच प्रदान केले. यामध्ये हॅन्डग्लोज, सॅनिटायझर, हॅन्डवॊश तसेच N95 मास्कचा सामावेश आहे. अश्या प्रकारची सुरक्षा किट दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक ग्राम विलगिकरणं कशातही वाटप करण्यात येणार आहेत. पत्रकार हा समाजासाठी झटत असतो मात्र त्याच्याकडे आज शासनाचे सुद्धा लक्ष नाही या कोरोना काळातही तो सतत समाजाचा विचार करून समाजपयोगी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असतो त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या रक्षणार्थ हे सुरक्षा कवच दिल्याचे यावेळी शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, हे सुरक्षा कवच किट महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोडामार्गच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गवस, जिल्हा सचिव शिरीष नाईक, तालुका खाजिनदार सुमित दळवी, सदस्य सुयश गवस यांनी स्वीकारले. यावेळी शिक्षक भारती दोडामार्ग शिक्षक नेते रवींद्र देसाई, जिल्हा सचिव अरुण पवार, जिल्हा सल्लागार महेश नाईक, जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पाटील, तालुका पदाधिकारी प्रसाद देसाई,यशवंत गवस, प्रमोद कुडास्कर उपस्थित होते. या सर्वांचे व शिक्षक भारती संघटना (प्राथमिक) यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दोडामार्गच्या वतीने आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page