मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम_
*💫सावंतवाडी दि.१४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील महावितरण कंत्राटी लाईनमन यांचा एक लाख रुपयाचा अपघाती विमा व मेडिक्लेम अशा सर्व कंत्राटी लाईनमन कामगारांचा इन्शुरन्स पॉलिसी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री एस एस भुरे व बांदा कनिष्ठ अभियंता श्री अनिल यादव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले तौक्ते चक्रीवादळात आपल्या जीवाची परवा न करता अनेक गावे अंधारात होती ती प्रकाशात आणण्याकरता या सर्व कामगारांनी मोलाची कामगिरी केली याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री गणेश कदम यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील कंत्राटी वीज कामगारांचे पॉलिसी मेडिक्लेम करण्याचे काम केले सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावचे कंत्राटी वायरमन यांचा अपघातात निधन झालंय त्यावेळी ही सर्व घटना मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांना तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सांगितले होती त्याची दखल जिल्हाध्यक्ष धीरज परब व लॉटरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री गणेश कदम यांनी सदर कंत्राटी कामगारांचे इन्शुरन्स उतरवण्याचे ठरवले व आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सदर पॉलिसी वितरणात करण्यात आले यावेळी महावितरण उपकार्यकारी अभियंता श्री एस. एस.भुरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व आपण कामगारांचे हित जपणे करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कामगारांना न्याय मिळण्याकरता एक प्रयत्न केला एक आनंदाची ची गोष्ट आहे व आपण याठिकाणी आलात कंत्राटी कामगारांना पोलिसी वितरण केलात महावितरण विभागाच्यावतीने मी आपले आभार व्यक्त करतो तसेच जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सांगितले की कंत्राटी कामगारांना महावितरणमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी याकरिता आमचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न चालूच आहे तसेच कंत्राटी कामगार यांनीही मनसेचे आभार मानले महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे ज्याने आमच्यासारख्या सर्वसामान्य कामगाराची दखल घेतली खरोखरच आपले मनापासून आभारी आहोत असे उद्गारही कंत्राटी कामगार यांनी काढले या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, परिवहन सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बनी नाडकरणी, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, एसटी परिवहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष ऍड अनिल केसरकर, तालुका सचिव विठ्ठल गावडे, तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मळेवाड विभागअध्यक्ष मंदार नाईक, शाखा अध्यक्ष राकेश परब, बाबुराव राऊळ, आनंद वसकर, मिलिंद टर्फे, सिद्धांत बांदेकर, मिलिंद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते
