केंद्र व राज्य सरकारच्या महागाई विरोधात आक्रमक
*💫सावंतवाडी दि.१४-:* केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि राज्य सरकारने वाढवलेल्या खाद्य तेल आणि वीजबिलचे वाढलेले दर या महागाईच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी आणि महिला आघाडी तर्फे धक्का मारो आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी दिनांक १५ जुन रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत गवळी तिठा ते तहसीलदार कार्यालय पर्यंत टॅक्सी, रिक्षा, मोटारसायकल, बैलगाडी इ. वाहने धक्के मारत तहसीलदार कार्यालय पर्यंत नेण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांनी केले आहे. हे आंदोलन एकाच वेळी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा क्षेत्रात काढण्यात येणार आहेत.
