अमोल आरोसकर यांचे गुळदुवे सरपंचांना आश्वासन
*💫बांदा दि.१३-:* सावंतवाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गुळदुवे सरपंच शीतल जोशी यांनी गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी भाजपचे युवा कार्यकर्ते अमोल आरोसकर यांची भेट घेतली. दरम्यान झालेल्या चर्चेत येत्या चार दिवसांत गुळदुवे गावात सुसज्ज विलगीकरण कक्ष सुरू करून देण्याचे आश्वासन अमोल आरोसकर यांनी दिले. प्रशासनाने गृह विलगीकरणास बंदी घालत संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावातच विलगीकरण कक्ष निर्माण करणे आवश्यक आहे. या विलगीकरण कक्षात रुग्णांच्या मनोरंजनासह इंटरनेटची सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अमोल आरोसकर यांनी गुळदुवे सरपंच शीतल जोशी यांना दिले.
