वेळे नंतर देखील सुरु होते दुकान;आरोंदा पोलिसांची कारवाई
*💫सावंतवाडी ता.१३-:* शासनाने नेमून दिलेल्या वेळे नंतर दुकान सुरू ठेवल्याने मळेवाड जकातनाका एका व्यावसायिकावर आरोंदा पोलिसांनी कारवाई केली आहे. यापूर्वी दोन वेळा सूचना पोलिसांनी देऊनही ठरवून दिलेल्या वेळेनंतर ही सदर व्यावसायिकाने दुकान सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आरोंदा दुरक्षेत्राचे हवालदार विजय केरकर यांनी दिली. तसेच कोंडुरातीठा येथे वीनामास्क फीरणाऱ्यावर दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगीतले.यावेळी केरकर यांच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परब हेही होते.
