करूळ घाटात दरड कोसळली

जेसीबीच्या साह्याने वाहतूक केली पूर्ववत

*💫वैभववाडी दि.१३-:* पावसाने आपले रुद्र रूप दाखविण्यास सुरुवात केली असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील करूळ घाटात दरड कोसळली. घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ही घटना रविवारी सकाळी 9 वा. च्या सुमारास घडली. पोलिसांनी दरड जेसीबीच्या साह्याने बाजूला करत मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली. मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. वाहन चालकांनी याची माहिती करुळ चेक नाक्यावर पोलिसांना दिली. वैभवावाडी पोलीस ठाण्यात माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव व सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनीच जेसीबीला मागवत जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करण्यात आली. यावेळी वाहतूक पोलीस श्री. राठोड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page