*डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच कडून करण्यात आला सन्मान; सर्व स्तरातून होत आहे कौतुक
*💫बांदा दि.१२-:* डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी यांच्यावतीने रोनापाल गावच्या पोलीस पाटील सौ. निर्जरा परब यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाच्या कठीण काळात प्रशासनाला पोलिस पाटीलांची मोठी मदत आजही होत आहे. या कठीण काळात पोलिस पाटील स्वतः आघाडीवर राहून काम करत आहेत. बाहेरून आलेल्या चाकरमानी आणि इतर लोकांना विलगी करणं कक्षात ठेवणे, त्यांची माहिती प्रशासनाला देणे, रूग्णांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सेवा करणे अशी अनेक कामे पोलिस पाटील करत आहेत. सौ. निर्जरा परब या करत असलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. गेल्यावर्षी देखील त्यांना माहिती सेवा समिती, महाराष्ट्र पश्चिमने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले होते. दोन वेळा त्यांच्या झालेल्या सन्मानामुळे सर्व स्तरातून सौ. निर्जरा परब यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
