*गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी दोघांना जामीन मंजूर*

*💫सावंतवाडी दि.१२-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विलास राख पसरे आणि भावेश पाटील (दोघेही रा. पुणे) यांना न्यायलयाने प्रत्येकी १५ हजाराच्या जामिनावर दोघांची मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले. याबाबत अधिक माहिती अशी की, १ जुन रोजी बांदा तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी एका पिकअप वर कारवाई करत गाडी आणि दारुसह १० लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यावेळी विलास राख पसरे आणि भावेश पाटील दोघेही रा. पुणे यांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायलयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर ५ जुन रोजी पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी जामीन अर्ज दाखल केला असता, दोघांनाही न्यायालयाने प्रत्येकी १५ हजाराचा जामिनावर मुक्तता केली आहे.

You cannot copy content of this page