*खासदार विनायक राऊत यांचे स्पष्टीकरण*
*💫सावंतवाडी दि.१० विनय वाडकर -:* रुग्णवाहिकेवरून जिल्ह्यात भाजपने निर्माण केलेला वाद हा केवळ शिवसेनेला श्रेय मिळू नये यासाठी करण्यात आला होता. परंतु आम्हाला श्रेय मिळावे यासाठी काही केले नाही. असे स्पष्टीकरण खासदार विनायक राऊत यांनी ऑनलाईन द्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्याला आतापर्यंतच्या पालकमंत्र्यांपैकी फक्त उदय सामंत यांनी रुग्णवाहिकेसाठी भरीव योगदान दिले आहे. खनिकर्म निधीमधून आतापर्यंत १४ रुग्णवाहिका देण्यात आल्या असून अजुन २५ रुग्णवाहिका देणार आहोत. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता असलेल्या विरोधकांना अजूनही साधी ओम्नी रुग्णवाहिका देता आली नाही. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
