*वेंगुर्ले तालुक्यातील आडेली व तुळस आरोग्य केंद्रासाठी दोन नवीन रुग्णवाहिका दाखल

*लोकप्रतिनिधींच्या हस्ते लोकार्पण

*💫वेंगुर्ला दि.१०-:* वेंगुर्ला तालुक्याला बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाकडून दोन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या. यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या प्रयत्नातून आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहीकेचे लोकार्पण भाजपचे तालुका चिटणीस व आडेली सोसायटी चेअरमन श्री समीर कुडाळकर यांच्या हस्ते, तर तुळस आरोग्य केंद्रासाठी प्राप्त झालेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले. गेली ८ वर्षे प्रतिक्षेत असलेली आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अखेर माजी जि.प. अध्यक्ष व रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मा. समीधा नाईक यांच्या प्रयत्नातून आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली. त्यावेळी नाईक यांच्या सूचनेनुसार श्री. कुडाळकर यांच्या सह आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजीवनी पाटील, डॉ. वंदन वेंगुर्लेकर, ग्रा.प.सदस्य तात्या कोंडसकर, आरोग्य सेवक शेखर कांबळी , श्री कडव, भाजपचे दशरथ गडेकर, संदेश सुकळवाडकर, समीर गडेकर, सागर परब, सत्यवान कुडाळकर, संतोष पेडणेकर, तेजस शेणई, कुणाल बिडये, आरोग्य कर्मचारी श्रीम. ठाकूर , श्रीम . मार्गी, श्री शेडगे तसेच ॲम्ब्युलन्स वाहक वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. तर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी खनीकर्म निधीतून मंजूर केलेल्या तुळस आरोग्य केंद्रासाठीच्या रुग्णवाहिकेचे तुळस सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुशील परब , वैद्यकीय अधिकारी झुन्नारे, माजी उपसरपंच जयवंत तुळसकर, ग्रामपंचायत सदस्य शेखर तुळसक, रामु परब, सचिन नाईक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .

You cannot copy content of this page