सात हजार पर्यंत नेण्याचा विचार : आरोग्य प्रशासनाला सुचना- पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
*💫सावंतवाडी दि.१०-:* जिल्ह्यात उद्यापासून कोरोना टेस्ट वाढवण्यात येणार असून, सात हजार कोरोना टेस्ट करण्याच्या सुचना जिल्हा आरोग्य प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख लोकांना पहिला डोस तर ५१ हजार लोकांना दुसरा डोस दिला गेला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एन. डी. आर. एफ. टीम तैनात करण्यात आल्या असून, योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली आहे.
