प्रत्येकी १५ हजाराचा जामीन मंजूर; अँड. परिमल नाईक यांनी पाहिले काम*
*💫सावंतवाडी दि०४-:* तालुक्यातील आंबोली येथे काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेचा खून करून काही युवकांनी त्या ठिकाणी टाकला होता. या गुन्हात एकूण ५ आरोपी असून यातील दोन आरोपी हे अल्पवयीन होते. या दोन अल्पवयीन आरोपींना आज बाल न्यायालयात हजर केले असता त्या दोन्ही अल्पवयीन आरोपींची प्रत्येकी १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करून त्यांची मुक्तता केली आहे. याकामी अँड परिमल नाईक यांनी काम पाहिले आहे.