रुग्ण वाहिकांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या नशीबी नाहीच

रणजीत देसाई यांचा आरोप

सिंधुदुर्गनगरी ता ०९ खनिकर्म निधीतून जिल्हा परिषद प्रशासनाने खरेदी केलेल्या रुग्णवाहिका चे लोकार्पण करणे पालकमंत्र्यांच्या नशिबात नाही. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून घाईगडबडीत उद्घाटन करून घ्यावे लागले ही शोकांतिका आहे. अशी टीका जिल्हा परिषद गटनेते तथा सदस्य रणजीत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेतून केली. खनिकर्म कल्याण निधीचा जवळपास ४२ कोटी नीधी पालकमंत्र्यांच्या अन शासनाच्या नाकर्तेपणामुळे हा निधी चार वर्षे अखर्चीत राहीला. यावर्षी या निधितून त्या त्या भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या रुग्णवाहिका मिळाल्यात! त्याही पालकमंत्र्यानी उद्घाटनासाठी अडवून ठेवल्या! खरेतर कोरोना साथीत रुग्ण तडफडत असताना या रुग्णवाहिका उद्घाटनाच्या प्रतीक्षेत पालकमंत्र्यांनी रखडवून ठेवल्यामुळे भाजपाला आंदोलन करावे लागले व स्थायी समिती सभेत जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी तातडीने हा निर्णय घेत तेथील नागरिकांच्या या हक्काच्या रूग्णवाहिका मंगळवारीच पुन्हा ताब्यात देण्याच्या सूचना दिल्यानेच आज पालकमंत्र्यांनी घाईगडबडीत ऑनलाईन लोकार्पण सोहळा केला असल्याची टीका भाजपा जिल्हा परिषद भाजपा गटनेते रणजीत देसाई यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत केली. गटनेते रणजित देसाई यांनी आज आँनलाईन पद्धतीने पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती महेंद्र चव्हाण, सदस्य श्वेता कोरगावकर, प्रितेष राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी रणजित देसाई म्हणाले की, खरे तर हा जिल्हा शासनाच्या अन्य उपक्रमात तसेच आरोग्यविषयक उपक्रमात नंबर वन होता. मात्र कोरोना साथीत हा जिल्हा खाली गेला आहे. कोरोणामध्ये हा जिल्हा रेडझोनमध्ये गेला आहे. रुग्णसंख्या वाढतच आहे व मृत्यू संख्याही त्याप्रमाणे वाढत आहे. राज्याच्या तुलनेत या जिल्ह्याकडे पालकमंत्री आणि शासनाचे दुर्लक्ष झाले आहेत हे कोरोना साथीतील आकडेवारीवरून उघड होत आहे. जिल्हा नियोजन निधीतून उपलब्ध झालेले २३ कोटी रुपये कोरोणा रुग्णांच्या सुविधेवर खर्च न होता चुकीच्या पध्दतीने खर्च झाल्यामुळे व्हेंटिलेटर व आरोग्य सुविधांची वानवा झालेली आहे. आणि म्हणूनच कोरोना रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहेत असेही यावेळी बोलताना रणजीत देसाई यांनी स्पष्ट केले. खरेतर सिंधुदुर्ग जि.प. ने कोरोना साथीत गार्भिर्याने लक्ष दिल्यामुळे जिल्हातील सव्वा दोन लाखापर्यन्त नागरीकांचे लसिकरणाचे काम पुर्ण करता आले आहे. जिल्हातील २४८ आरोग्य उपकेंद्रे व ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेने सक्षम ठेवली आहे. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावर सदैव दक्ष असल्यामुळे नागरिकांसाठी ती आधार ठरली आहेत. लसीकरणा बरोबरच नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा या व्यवस्थेतून कार्यक्षमपणे पुरविण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न राहिला आहे. पूर्ण साथीत नागरिकांना मदत मिळावी म्हणून जिल्हा परिषदेकडून सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत अशी माहिती यावेळी बोलताना रणजित देसाई यांनी दिली. बॉक्स…. हौस भागवावी पण रुग्णांना वेठीस धरू नये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला ऑनलाईन उद्घाटनाची सवय झाली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी कोविड केअर सेंटर रुग्णवाहिका, ऑक्सिजन प्लांट यांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करून आपली हौस भागवावी परंतु स्वतःच्या हस्ते उद्घाटन व्हावे या हौसेपोटी आणि अट्टाहासापोटी येथील जनतेच्या व रुग्णांच्या जीवाशी खेळ करू नये त्यांना वेठीस धरू नये असे सांगत जे करायचे आहे ते वेळीच करा असा सल्लाही रणजित देसाई यांनी यावेळी दिला आहे.

You cannot copy content of this page