सावंतवाडी न प विलगिकरण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी राजन तेलिंचे प्रतिपादन
*💫सावंतवाडी दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या आणि मृत्यूचा आकडा हा भीतीदायक असल्याचे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले आहे. सावंतवाडी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या विलगी करण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी त्यानी आज पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, आज संपूर्ण आरोग्य व्यवस्था जीवाचे रान करत असताना त्यांना हवा असलेला राजकीय पाठिंबा आणि ताकद मिळत नाही आहे. यासाठी आवाज उठवणे गरजेचे बनले आहे. आज टेस्ट वाढवले असल्याने रुग्ण संख्या मोठ्या संख्येने मिळत आहे, असे बोलले जात आहे. परंतु, मुंबईसारख्या शहरातील दिवसाचे मृत्यू प्रमाण पाहताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. यामगाचे कारण शोधण्यासाठी आपण टास्क फोर्स जिल्ह्यात पाठवण्याची वेळोवेळी मागणी केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला आहे.
