चिंदर उपकेंद्राला आँक्सिजन सिंलेडर आणि औषधांचे किट प्रदान

*💫मालवण दि.०९-:* ग्रामपंचायत चिंदरला अशोक रावराणे (अंधेरी मुंबई ) यांच्या कडून दिलेला आँक्सिजन सिंलेडर व उद्योजक प्रकाश मेस्री यांनी आरोग्य केंद्राला लागणारी औषधे व गोळ्यांचे दिलेले किट आरोग्य उपकेंद्र चिंदर येथे आरोग्य सेवक श्री. गोसावी व जंगले सिस्टर यांच्याकडे सरपंच सौ. राजश्री कोदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, तंटामुक्ती सदस्य संतोष गांवकर, ग्रां.सदस्य महेंद्र मांजरेकर,उद्योजक प्रकाश मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते भाई तावडे, दत्ता वराडकर, विवेक(राजु)परब, मोरेश्वर गोसावी,विश्राम माळगांवकर हे उपस्थित होते.

You cannot copy content of this page