प्राथमिक शिक्षक भारतीचा लक्षवेधी उपक्रम;बुधवार व रविवारी पुरवीणार भोजन
*💫दोडामार्ग दि.०९ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात या अगोदर अनेक समाजकामात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या “शिक्षक भारती संघटनेने” आता कोरोना काळात कोव्हिडं केअर सेंटर मध्ये अन्न वाटपाचे पवित्र कार्य हाती घेतले आहे. दोडामार्ग तालुक्यातील आय टी आय येथील कोव्हिडं सेंटर मध्ये या संघटनेने रुणांसाठी दर बुधवार व रविवार या दोन दिवशी हे आहार वाटप होणार आहे, आज दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या उपस्थितीत हा आहार वाटप करण्यात आला. आता दोडामार्ग कोव्हिडं सेंटर मध्ये “बिर्याणी व अंडा करीचा” लाभ कोरोना रुग्णांना मिळणार आहे. यावेळी डॉ ऐवळे यांसह कोव्हिडं सेंटरची व्यवस्था पाहणारे गजानन भणगे,शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा सचिव अरुण पवार, तालुकाध्यक्ष मणीपाल राऊळ, सचिव सखाराम झोरे, उपाध्यक्ष मारोती मिराशे, संघटक यशवंत गवस, दयानंद नाईक, जनार्दन पाटील, दत्तप्रसाद देसाई, निलेश सावंत यांसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे संघटनेकडून दोडामार्ग चेकनाक्यावर आहार वाटप केले तसेच गावात नव्याने स्थापन झालेल्या ग्राम विकगीकरण कक्षात संघटनेमार्फत फेस शिल्ड मास्क, सॅनिटायझर, मास्क याचेही वाटप करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
