कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते लोकार्पण
*💫कणकवली दि.०९-:* कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता खारेपाटण ग्रामपंचायत व खारेपाटण ग्रामस्थांच्यावतीने येथील शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलच्या इमारतीमध्ये बनविण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे उदघाटन नुकतेच कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधीकारी डॉ संजय पोळ, मंडल अधिकारी मंगेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या विलगिकरण कक्षाच्या उदघाटन प्रसंगी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक, महेश कोळसुलकर, संकेत शेट्ये,उपसरपंच इस्माईल मुकादम,माजी सरपंच संदेश धुमाळे,रश्मी रमाकांत राऊत, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर,महेंद्र गुरव,शंकर राऊत,उज्वला चिके,अंजली कुबल,ग्रामविकास अधिकारी जि सी वेंगुर्लेकर,तलाठी ए वाय सिगनाथ, आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. खारेपाटण हायस्कुल येथील विलगिकरण कक्षात एकूण १० बेडची व्यवस्था करण्यात आली असून जर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास अजूनही लागणाऱ्या बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक ग्राम सनियंत्रण समितीच्यावतीने देण्यात आली.
