बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कामगिरी_
*💫बांदा दि.०९-:* बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बांदा येथील परप्रांतीय कामगार खून प्रकरणातील मुख्य संशयिताच्या मुसक्या बांदा आवळल्या आहेत. उल्हासनगर येथून सुखदेव नामक संशयिताला मंगळवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. सदर संशयित बांदा येथे सेंट्रीगचे काम करत होता. पश्चिम बंगाल येथील विश्वजित मंडल या कामगाराचा शनिवारी मध्यरात्री धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणात सेंट्रींग व्यवसायाशी संबंधित शहरातील तीन परप्रांतीय युवकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मृताची पत्नी व मुलांचे जबाब यातून पोलिसांना संशयिताची बर्यापैकी माहिती प्राप्त झाली होती. त्याआधारे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्यासह काँस्टेबल संजय हुंबे व विठोबा जाधव यांचे पथक संशयिताच्या मागावर मुंबईत पोहोचले. रात्री उल्हासनगर येथून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळातच पोलिसांचे पथक बांद्यात पोहचणार आहे. संशयिताच्या चौकशीनंतर खून कोणत्या कारणासाठी केला हे स्पष्ट होणार आहे. तसेच खूनात अन्य कोणाचा सहभाग होता का ? हेही आता स्पष्ट होणार आहे.
