अभ्यासू, प्रतिथयश वकील ते छाप पाडणारे नगरसेवक

सावंतवाडी शहराला लाभलेले भारदस्त व्यक्तिमत्व म्हणजे अँड परिमल नाईक

*💫सावंतवाडी दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित वकील म्हणून सावंतवाडी शहरातील अँड. परिमल गजानन नाईक यांच्याकडे पाहिले जाते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण सावंतवाडीत पूर्ण केल्या नंतर त्यांनी आपल्या पुढील शिक्षणासाठी पुणे येथे जाण्याचे ठरवले. पुण्यामध्ये त्यानी I.L.S. कॉलेज मध्ये LL.B चे ५ वर्षाचे शिक्षण त्यानी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत पूर्ण केले. तसेच त्यांनी D.T.L. आणि D.L.L. मध्ये स्पेशल डिप्लोमा पूर्ण केला आहे. सन १९९२ सालापासून त्यानी मुंबई उच्च न्यायालयात त्यानी आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केली. परंतु आपल्या मातृभूमीची कोकणची ओढ असल्याने १ वर्षाच्या आतच ते सिंधुदुर्गात आले आणि त्यांनी इथेच आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यानी सिंधुदुर्गातील विविध न्यायालयात वकील म्हणून काम केले. सिंधुदुर्गात काम करत असताना २००० साल त्यांच्यासाठी खुप महत्वाचे ठरले. या सालात त्यांना दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु काही कौटुंबिक कारणामुळे ते त्या पदावर रुजू झाले नाहीत. त्याच सालात महाराष्ट्र राज्य न्याय आणि विधी शाखा मंत्रालयामार्फत त्यांची निवड जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता म्हणून करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विधी व न्याय शाखेने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नोटरी पब्लिक पदी त्यांची नियुक्ती केली गेली. सिंधुदुर्ग जिल्हा नोटरी असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून आजही ते त्या पदावर नियुक्त आहेत.२०१७-२०१८ साली त्यांची निवड वकील संघटनेच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक यशस्वी वकील म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे त्यानी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. २०१७ साली सावंतवाडी नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्य घेवून ते प्रभाग क्रमांक ८ मधून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने लक्ष देवून सोडवले. २०२० साली सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य सभापती पदी त्यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. जगावर पसरलेल्या कोरोना नामक संकट काळात ते सावंतवाडी शहरासाठी एक योद्धा म्हणून काम करत आहेत. कोरोना सारख्या भीषण व गंभीर आजाराच्या कालखंडात त्यांच्याकडे सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असताना, त्यांनी त्यावेळी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवून एक लढवय्या योद्ध्याची भूमिका लीलया पार पाडली आहे. त्यांच्या आरोग्य सभापती चा काळात महाराष्ट्र राज्यात २०२० – २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षण अणि माझी वसुंधरा अभियान यामध्ये सावंतवाडी शहराला राज्यात १७ तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. यावेळी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात तत्कालीन आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी अनेक प्रयत्न केले. यावेळी त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन त्या – त्या वॉर्ड मधील सर्व नगरसेवक, पालिका प्रशासनाचे अधिकारी व पालिका कर्मचारी यांच्या मदतीने नागरिकांमध्ये सुमारे २५ सभा घेऊन जनजागृती केली होती. यावेळी त्यांनी कचऱ्याचे विलगीकरण कसे करावे, घरात निर्माण होणाऱ्या विघटनशील कचऱ्यावर कश्या प्रकारे प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करावी तसेच स्वच्छते बाबत असलेले कायदे देखील समजवून सांगितले होते. तसेच या काळात त्यांनी “३ आर” म्हणजेच रिड्यूस‌ (कमी वापर करणे), रियुज ( पुनर्वापर करणे), रिसायकल ( पुनर्प्रक्रिया करण्यायोग्य वस्तू संकलन) ची संकल्पना राबवली होती. आणि ती मोठ्या प्रमाणात यशस्वी देखील झाली. याच बरोबर त्यानी नगरपालिकेच्या आवारात माणुसकीची भिंत ही संकल्पना राबवत आपला एक वेगळा पैलू सावंतवाडीकर नागरिकांना दाखवून दिला. त्याच बरोबर ज्ञानाचे दान आणि १ किलो पुनर्प्रक्रिया होणारे प्लास्टिक द्या आणि १ किलो सेंद्रिय खत न्या असे अभिनव उपक्रम त्यांनी शहरात राबविले. लायन्स क्लब मार्फत ते अखंड समाजसेवेत मग्न असून अनेक कामे त्यांनी केली आहेत. अनेक समाजाभिमुख कामे करत त्यानी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. या संकटकाळात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता आत्यावाश्यक सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी महिना दोन महिने लायन्स क्लब मार्फत चहा आणि नाष्टा ची सोय केली. प्रसंगी त्यांना जेवण देखील देण्यात आले. सामाजिक भान ठेवत त्यानी विविध कामे केली आहेत. एक आदर्श वकील प्रमाणे ते सच्चे पर्यावरण प्रेमी देखील आहेत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ते नेहमी सक्रिय असतात. त्यांचे सुरू असलेले समा

You cannot copy content of this page