नगराध्यक्ष परब सुद्धा मडुऱ्यातून आले आहेत

पदे घेण्यासाठी बेळगांव येथून माणसे आयात करावी लागली सुधीर आडीवरेकर यानी लक्षात घ्यावे: बाबू कुडतरकर यांचा टोला

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ ते जरी नेमळै गावातील असले तरी सावंतवाडी तालुक्याचे ते सुपुत्र आहेत आणि ते सत्ताधारी पक्षाचे शिवसेना तालुका प्रमुख आहेत सावंतवाडी शहरांमध्ये राहतात मात्र सावंतवाडी नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष संजु परब हे मडूऱ्यातूनच आले आणि आपल्या पक्षातले पद देण्यासाठी काहीजणांना बेळगाव वरून आयात करावे लागले हे सर्वप्रथम आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरकर यांनी लक्षात द्यावे आणि नंतरच शिवसेनेवर टिका करावी असा टोला शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी लगावला आहे. माजी गृहराज्यमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर हे तीन वेळा या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे शहरात झाली आहेत आणि आजही नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे ही त्यांच्याच आमदार विकास निधी आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून होत आहेत त्यांनी सावंतवाडी शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकला या शहराला एक चेहरा निर्माण करून जगासमोर आदर्श शहर म्हणून नावारूपाला आणले आहे. सावंतवाडी नगर परिषदेला मिळालेला माझी वसुंधरा या पुरस्कारा सारखे यापूर्वीच अनेक पुरस्कार सावंतवाडी नगरपरिषदेने शिवसेनेच्या सत्ता काळामध्ये मिळवलेले आहेत. त्यामुळे या मिळालेल्या पुरस्कारांचा पाया खरा आमदार केसरकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकीर्दी मध्ये उभारला गेला आहे. असे बाबू कुडतरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे शहराला खरी दिशा देण्याचं काम दिपक भाई केसरकर यांनी केलं आहे म्हणून शहरवासीय दीपक भाऊ यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत दीपक भाई हेच शहराचे खरे शिलेदार आहेत. यापूर्वी सुद्धा नगर परिषदेचे आणि सावंतवाडीवासियांचे खरे कर्ताकरविता हे दिपक केसरकर आहेत.संजू परब आले आणि संजू परबानी या शहराचा नक्षा बदलला अस कुठच कार्य त्यांनी केलं का? हे त्यांनी सांगावं. असे आव्हान कुरतडकर यांनी दिले आहे माझी वसुंधरा हा मिळालेला पुरस्कार हा आमदार दीपक केसरकर आणि पूर्वीचे नगराध्यक्ष यांच्या परिश्रमाचे फलित आहे ज्यांनी ज्यांनी या शहराला घडवण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न आमच्या पक्षाच्या सत्ता काळामध्ये झाले आहेत त्याचे फुक्याचे श्रेय घ्यायचा प्रयत्न नगराध्यक्ष परब यांनी करू नये अन्यथा सावंतवाडी शहराचा खुंटलेला विकास, कोरोना मुळे झालेली परिस्थिती, सावंतवाडी शहरात होणारे दंगे व रस्त्यावर होणाऱ्या मारामाऱ्या याचे सुध्दा श्रेय संजू परब यांनी द्यावे असा टोला कुडतरकर यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page