जिल्हाधिकारी निवास वसाहतीतिल शेडला लावण्यात आली आग

पोलिसांत तक्रार दाखल

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०७-:* सिंधूदुर्गनगरीतील जिल्हाधिकारी वसाहतीत प्रियेश प्रभाकर कळझुणकर यांची सायकल लावण्यासाठी तातपुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या शेड अज्ञात इसमानी आग लावल्याचा प्रकार ३ जून रोजी पहाटे २ वाजता घडला आहे. यात त्यांची सायकल जळाली असून शेजारी असलेले अन्य एक शेड जळाली आहे. याबाबत कळझुणकर यानी सिंधूदुर्गनगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कळझुणकर यानी पोलिसांत दिलेल्या फिर्यादित ‘आपण सिंधूदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी वसाहत मधील टाईप १, बिल्डिंग नं १०, रूम नं १ मध्ये राहतो. आपण निवासस्थाना शेजारी पावसाळ्यात सायकल उभी करण्यासाठी तातपुरत्या स्वरूपाची शेड उभी केली आहे. ३ जून रोजी पहाटे २ वाजता आम्ही गाड झोपेत असताना आग लागली. या आगीचा मोठा होता. यामुळे शासकीय निवासस्थाना शेजारी उभ्या केलेल्या सायकल, दुचाकी जळण्याची दाट शक्यता होती. अचानक आगीचा उजेड दिसल्याने आपल्या आईने पाहिले. त्यावेळी तिने सर्व शेजाऱ्यांना जागे केले. त्यानंतर तेथे असलेल्या सर्व गाड्या बाजूला केल्या गेल्या. मात्र, यात आपली शेड पुर्ण जळाली. सातकल जळली. आग लागल्याचे समजल्या नंतर आग लावणारी अज्ञात व्यक्ती पळून गेली. आपल्या शेजारी असलेली शेड सुद्धा जळाली आहे. असा प्रकार वारंवार शासकीय संकुलात घडत आहे. त्यामुळे वेळीच व योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कळझुणकर यानी केली आहे. पोलिसांना कारवाईसाठी दिलेल्या निवेदनात नीलेश झाड, सौ मयेकर, राजन गिरकर, रसिका कांबळे, मयूरी भालेकर यांची नावे आहेत.

You cannot copy content of this page